“आपल्या तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेची तपासणी करा आणि ती सुधारण्यासाठी उपाय शोधा.”
या प्रश्नावलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये Critical Thinking म्हणजेच तर्कशुद्ध विचार करण्याचे अध्ययन कौशल्य कितपत आहे हे समजण्यास मदत होते. या माहितीच्या आधारे, मुलांना त्यांच्या तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेत सुधारणा करण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाऊ शकते, जेणेकरून त्यांचे विचार अधिक तर्कशुद्ध, सुसंगत, आणि पुराव्याधारित असतील. ज्यामुळे त्यांची अध्ययन क्षमता वाढून गतीने अध्ययन करता येईल.
चाचणीसाठी दिग्दर्शन (Instructions)
परिचय:
“Critical Thinking म्हणजेच तर्कशुद्ध विचारांची क्षमता आपल्या निर्णय प्रक्रियेवर कशी प्रभाव टाकते हे शोधा. आपण 10 प्रश्नांची उत्तरं देणार आहात, ज्यामुळे आपल्या तर्कशुद्धतेची पातळी मोजता येईल.”
सूचना:
“प्रत्येक प्रश्नासाठी 1 ते 5 गुण दिले जातील. आदर्श वाटणारा नाही तर आपणास लागू होणारा योग्य पर्याय निवडा. “
चुकीच्या उत्तरांची भीती बाळगू नका – ही चाचणी शिकण्यासाठी आहे, तपासण्यासाठी नाही.